Saturday, 20 August 2011

आई - मराठी कविता/चारोळी, marathi poems, marathi kavita, marathi charoli, kavita

आई - मराठी कविता/चारोळी, marathi poems, marathi kavita, marathi charoli, kavita





खुप कष्ट केलेस आई, खुप घेतलास त्रास
दारिद्र्य तर फिरकलेच नाही आमचा आस पास,
नाही कमी पडली आम्हाला शिक्षणाची पाटी
नाही आम्हाला कमी पडली जेवणात तूप रोटी

काबाडकष्ट करण्याचा तु घेतलाच होतास ध्यास
स्वतः उपाशी राहुन आम्हाला भरवत होतीस घास,
तुझ्या स्पर्शाने होतो मला नेहमीच देवाचा भास
असु शकतो का ग देव याहुन वेगळा खास?

एकच खंत राहील आता नेहमी माझा मनात
म्हातारपणी देऊ शकणार नाही तुला मी साथ,
नाही होऊ शकणार तुझा आधाराची काठी
म्हातार वयात सोडून चाललो तुला मी आई एकटी

खुप प्रयत्न केले पण अंगात नाही राहिला त्राण
Cancer ने या केलाय मला पुरताच हैराण,
कोणत्याही क्षणी जाऊ शकतात माझे आता प्राण
यमराज स्वतः उभे दारात घेऊन त्यांचे वाहन

देवाघरी जाऊन करेन प्रणाम कोटी कोटी
कितीही जन्म लागले तरी वाट पाहेन तुझासाठी,
फुल, दुर्वा, खणानारळाने भरेन देवाची ओटी
पुन्हा एकदा जन्म घेईन आई तुझा पोटी
मी आई तुझाच पोटी...........



------अनुप चव्हाण


No comments:

Post a Comment