Saturday 24 September 2011

प्रेमातलं वागणं - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli

प्रेमातलं वागणं - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli

प्रेमातलं वागणं

तुझा माझाकडे हळूच पाहण
तुला पाहून मी हळूच लाजणं

मी स्वतःला आरशात बघणं
आणि आरशात चक्क तू दिसणं

तू मला स्वप्नं देणं
आणि मी त्यात रंगून जाण

तुझा माझाशी बोलायला येणं
मी मात्र उगाच टाळाटाळ करणं

तू सतत माझी वाट पाहणं
मी नेहमी उशिरा येणं

मग तुझं माझावर चिडणं
आणि मी हळुवारपणे समजावणं

काय बरं हे सगळं असावं
कदाचित यालाच प्रेम म्हणावं !  हो ना
 
Friday 9 September 2011

स्वप्नं - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli

स्वप्नं - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli

स्वप्नं

खूप बघितली आहेत स्वप्नं
निदान एक तरी पूर्ण होऊ दे
उसळणाऱ्या या लाटांत
मला आत्ता तरी किनारा मिळू दे

स्वप्नातल्या या नगरी
प्रत्यक्षात तरी दिसू दे
दुःख भरलेल्या या जीवनात
सुखाचे क्षण तरी येऊ दे

स्वप्नातला इंद्रधनुष्य
घरातीवर आता उतरू दे
सार्र्या सात त्याच्या रंगात
मला आता रमू दे

---- अनुप चव्हाण

स्वप्नांच्या पलीकडे - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good kavita, good poems, love poems, premacha kavita,

स्वप्नांच्या पलीकडे - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good kavita, good poems, love poems, premacha kavita,

स्वप्नांच्या खूप पलीकडे
माझं एक विश्व असावं
पूर्ण नाही पण थोडा वेळ
तू माझासोबत असावं

विश्व जरी मोठ नसलं
तरीही ते सुंदर असावं
माझं तुझावर आणि तुझं
माझावर खूप प्रेम असावं

काही नाही मिळालं तरी
हे एक स्वप्नं साकाराव
आपलं प्रेम नेहमीच
फुलाप्रमाणे फुलावं

          ---- अनुप चव्हाण