Friday 13 January 2012

शिंपी आणि ड्रेस - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli

शिंपी आणि ड्रेस  - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli



शिंपी आणि ड्रेस

एके काळी शिंपिला ड्रेस शिवायला
नेहमी कपडे कमी पडायचे
आता तो शिंपी समोरचा मुलीला विचारतो
यात २ ड्रेस शिवायचे कि ३ शिवायचे


                                      ----अनुप चव्हाण



Thursday 12 January 2012

वाढती महागाई - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli

वाढती महागाई  - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli



वाढती महागाई

रस्त्याच्या कडेला एकदा एक लहान बाळ रडत होते,
चिमुकल्या त्याच्या डोळ्यातून अश्रू खळा खळा वाहत होते,
त्याला पाहुन माझा एक वेगळाच विचार आला
ह्याला पुढच्या वाईट परिस्थितीचा आताच नाही ना साक्षात्कार झाला?

खुप कठीण जाणार आहे आता येणारा पुढचा काळ
सर्वाना कोंडीत पकडणार वाढत्या महागाईचा मायाजाल
सकाळी कामासाठी घर सोडणारा माणूस संध्याकाळी परतेल याचा नेम नाही
कबड्डी, हु तू तू , आट्यापाट्या आता उरलेच नाहीत गेम काही

मौज, मज्जा, मस्ती, आता राहिलीच नाही
पैशांपुढे माणसाला आता दिसत कुठे काही?
खुप पैसे कमावून काय जीवन सुखी होणार
पण नाहीच कमावले पैसे तर जीवन तरी कसं जगणार?

जीवाचा आटापिटा करून सुद्धा हसत जगतोय माणूस
काय राहिलंय त्याचा जीवनात, त्या वरचा देवालाच ठाऊक
अशा जगात बिचाऱ्या या बाळाला आणून सोडलंय
याचं विचारांनी बहुतेक ते बाळ रडत बसलंय
बिचारं ते बाळ रडत बसलंय........


                                                                                       ---- अनुप चव्हाण