Saturday, 24 September 2011

प्रेमातलं वागणं - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli

प्रेमातलं वागणं - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli

प्रेमातलं वागणं

तुझा माझाकडे हळूच पाहण
तुला पाहून मी हळूच लाजणं

मी स्वतःला आरशात बघणं
आणि आरशात चक्क तू दिसणं

तू मला स्वप्नं देणं
आणि मी त्यात रंगून जाण

तुझा माझाशी बोलायला येणं
मी मात्र उगाच टाळाटाळ करणं

तू सतत माझी वाट पाहणं
मी नेहमी उशिरा येणं

मग तुझं माझावर चिडणं
आणि मी हळुवारपणे समजावणं

काय बरं हे सगळं असावं
कदाचित यालाच प्रेम म्हणावं !  हो ना
 
Friday, 9 September 2011

स्वप्नं - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli

स्वप्नं - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good poems, good kavita, chan kavita, charoli

स्वप्नं

खूप बघितली आहेत स्वप्नं
निदान एक तरी पूर्ण होऊ दे
उसळणाऱ्या या लाटांत
मला आत्ता तरी किनारा मिळू दे

स्वप्नातल्या या नगरी
प्रत्यक्षात तरी दिसू दे
दुःख भरलेल्या या जीवनात
सुखाचे क्षण तरी येऊ दे

स्वप्नातला इंद्रधनुष्य
घरातीवर आता उतरू दे
सार्र्या सात त्याच्या रंगात
मला आता रमू दे

---- अनुप चव्हाण

स्वप्नांच्या पलीकडे - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good kavita, good poems, love poems, premacha kavita,

स्वप्नांच्या पलीकडे - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, good kavita, good poems, love poems, premacha kavita,

स्वप्नांच्या खूप पलीकडे
माझं एक विश्व असावं
पूर्ण नाही पण थोडा वेळ
तू माझासोबत असावं

विश्व जरी मोठ नसलं
तरीही ते सुंदर असावं
माझं तुझावर आणि तुझं
माझावर खूप प्रेम असावं

काही नाही मिळालं तरी
हे एक स्वप्नं साकाराव
आपलं प्रेम नेहमीच
फुलाप्रमाणे फुलावं

          ---- अनुप चव्हाण

Wednesday, 24 August 2011

meena kumari actress poem, poems, urdu poem, nice urdu poem, poem written by meena kumari, meena kumari

meena kumari actress poem, poems, urdu poem, nice urdu poem, poem written by meena kumari, meena kumari

मीना कुमारी उर्दू कविता

टुकडे-टुकडे दिन बीता, धज्जी-ध्ज्जी रात मिली
जितना-जितना आंचल था, उतनी ही सौगात मिली

रिमझिम-रिमझिम बुंद में, जहर भी है और अमृत भी
आंखे हंस दी दिल रोया, यह अच्ही बरसात मिली

जब चहा दिल को समझे, हसणे की आवाज सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली

मातें कैसी घातें क्या, चलते राहणा आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली

होठो तक आते-आते, जाणे कितने रूप भरे
जलती-बुझती आंखो में, सादा-सी जो बात मिली

-----मीना कुमारी

meena kumari actress poem, poems, urdu poem, nice urdu poem, poem written by meena kumari

meena kumari actress poem, poems, urdu poem, nice urdu poem, poem written by meena kumari

मीना कुमारी उर्दू कविता

पूछते हो तो सुनो कैसे बसर होती है
रात खैरात कि सद्क़े की सहर होती है

सांस भरणे को तो जीना नही.न कहते या रब
दिल हि दुखता है न अब आस्तीन तर होती है

जैसे जागी हुई आंखो मे चुभे न कांच के ख्वाब
रात इस तऱ्ह दीवानो कि बसर होती है

गम हि दुश्मन है मेरा गम हि को दिल धुंडता है
एक लम्हे कि जुदाई भी अगर होती है

एक मर्कझ कि तलाश एक भटकती खुशबू
कभी मंझील कभी तम्हीद-ए-सफर होती है

-------मीना कुमारी

Tuesday, 23 August 2011

स्पर्धा - मराठी कविता / चारोळी, marathi kavita, marathi poems, marathi charolya, kavita, chan kavita, chotya kavita

स्पर्धा - मराठी कविता / चारोळी, marathi kavita, marathi poems, marathi charolya, kavita, chan kavita, chotya kavita

स्पर्धा

खुर्ची, मोठेपणा आणि पैसे यांच्या
मागे धावताना जीव जातो अर्धा
प्रेम, आपुलकी खूप मागे राहिले
आता उरली ती फक्त स्पर्धा

----- अनुप चव्हाण

Saturday, 20 August 2011

हसुन, लाजुन - मराठी कविता/चारोळी, marathi kavita, marathi poems, marathi charoli, kavita, chan kavita

हसुन, लाजुन - मराठी कविता/चारोळी, marathi kavita, marathi poems, marathi charoli, kavita, chan kavita

हसुन, लाजुन पुढे निघुन जान
मग हळुच लपुन मागे वळुन पाहणं
काय तुझा चालणं, तुझी ती नाजूक अदा
अपुन तर साला तुझावर फुल्टू फिदा

------अनुप चव्हाण

आरसा - मराठी कविता/चारोळी, marathi kavita, marathi charoli, kavita, chan kavita

आरसा - मराठी कविता/चारोळी, marathi kavita, marathi charoli, kavita, chan kavita

आरसा

आरशात माणसाला आपलं प्रतिबिंब
नेहमी उलटं का दिसत असेल?
का आपलं खरं रूप दाखवणं
आरशाला हि आवडत नसेल

------अनुप चव्हाण

आई - मराठी कविता/चारोळी, marathi poems, marathi kavita, marathi charoli, kavita

आई - मराठी कविता/चारोळी, marathi poems, marathi kavita, marathi charoli, kavita

खुप कष्ट केलेस आई, खुप घेतलास त्रास
दारिद्र्य तर फिरकलेच नाही आमचा आस पास,
नाही कमी पडली आम्हाला शिक्षणाची पाटी
नाही आम्हाला कमी पडली जेवणात तूप रोटी

काबाडकष्ट करण्याचा तु घेतलाच होतास ध्यास
स्वतः उपाशी राहुन आम्हाला भरवत होतीस घास,
तुझ्या स्पर्शाने होतो मला नेहमीच देवाचा भास
असु शकतो का ग देव याहुन वेगळा खास?

एकच खंत राहील आता नेहमी माझा मनात
म्हातारपणी देऊ शकणार नाही तुला मी साथ,
नाही होऊ शकणार तुझा आधाराची काठी
म्हातार वयात सोडून चाललो तुला मी आई एकटी

खुप प्रयत्न केले पण अंगात नाही राहिला त्राण
Cancer ने या केलाय मला पुरताच हैराण,
कोणत्याही क्षणी जाऊ शकतात माझे आता प्राण
यमराज स्वतः उभे दारात घेऊन त्यांचे वाहन

देवाघरी जाऊन करेन प्रणाम कोटी कोटी
कितीही जन्म लागले तरी वाट पाहेन तुझासाठी,
फुल, दुर्वा, खणानारळाने भरेन देवाची ओटी
पुन्हा एकदा जन्म घेईन आई तुझा पोटी
मी आई तुझाच पोटी...........

------अनुप चव्हाण

Thursday, 18 August 2011

वैर - मराठी कविता/चारोळी, marathi poems, marathi kavita, hindu muslim kavita,

वैर

का धरतात हिंदूंशी वैर
का हे पाकिस्तानी ब्लास्ट करतात?
या लोकांना एवढं हि नाही समजत
स्फोटात हिंदूच नाही मुसलमान हि मरतात

----- अनुप चव्हाण

सात फेरे - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, lagnacha kavita

सात फेरे - मराठी कविता / चारोळी, marathi poems, marathi kavita, lagnacha kavita

सात फेरे

सात फेरे, मंगलाष्टके, याची काय किंमत करतात
जीन्स घातल्यावर मुली डोक्याला कुंकू लावायला लाजतात,
खूप प्रेम केलं तरी तेवढ्यापुरतीच सुखावतात
मग छोटसं भांडण झालं तरी घटस्फोटसाठी धावतात.

------अनुप चव्हाण

Tuesday, 16 August 2011

सभ्य माणूस - मराठी कविता/चारोळी, marathi kavita, marathi, poems,

सभ्य माणूस - मराठी कविता/चारोळी, marathi kavita, marathi, poems,

सभ्य
माणूस

खाली मान घालून चालणारा माणूस
सभ्य असेलच असं नाही,
पृथ्वीवर पाप करून दमला असेल
आता पाताळात शोधत असेल काही

---- अनुप चव्हाण

धोका - मराठी कविता/चारोळी, marathi poems, navin kavita, premat dhoka

धोका - मराठी कविता/चारोळी, marathi poems, navin kavita, premat d

एकाशी प्रेम आणि दुसऱ्याशी लग्न,
विचारानेच कंठ येतो दाटून,
कसे जगत असतील हे जीवन
हृदयाचे दोन तुकडे करून

----अनुप चव्हाण

Thursday, 11 August 2011

स्वातंत्र्य दिवस/ Independance Day - मराठी कविता/चारोळी, Marathi Poem, Festival Poems

स्वातंत्र्य दिवस/ Independance Day - मराठी कविता/चारोळी, Marathi Poem, Festival Poems

स्वातंत्र्य दिवस

ऑक्टोबर रोजी एक वीर जन्माला आला
खादीचे कपडे घालून ज्याने सत्याग्रह केला
ब्रिटीश लोकांना त्याने सळो कि पळो केला
१५ ऑगस्ट रोजी आपला भारत स्वतंत्र झाला

----- अनुप चव्हाण

Wednesday, 10 August 2011

डोळे भरून - मराठी कविता/चारोळी, Marathi Poems, Marathi Charoli

डोळे भरून - मराठी कविता/चारोळी, Marathi Poems, Marathi Charoli

मला भेटायला आलीस कि
तुला नेहमी जायची घाई असते
मला मात्र तुला जाण्याआधी एकदा
डोळे भरून पहायचं असते

------अनुप चव्हाण

रक्षाबंधन - मराठी कविता/चारोळी, Poems, Marathi Poems

रक्षाबंधन - मराठी कविता/चारोळी, Poems, Marathi Poems

नात आपलं नितळ प्रेमाचं
बांधून ठेवलंय या राखीने,
जीवनात यश मी साधु शकलो
ताई तुझाच तर साथीने

----- अनुप चव्हाण

रक्षाबंधन - मराठी कविता/चारोळी, poems, Marathi Poems

रक्षाबंधन - मराठी कविता/चारोळी, Marathi Poems

प्रेमात असतो गोड जिव्हाळा
प्रेम असते अतुट बंधन
जोडलं हे बंधन राखीत
आणि झालं सुरु रक्षाबंधन

---- अनुप चव्हाण

नशीब - मराठी कविता/चारोळी, Marathi Poems

नशीब - मराठी कविता/चारोळी, Marathi poems

वेळेच्या आधी आणि नाशिबाशिवाय काही मिळत नसतं
हाच विचार करून मन नेहमी फसत असत,
नशिबावर मात करणं शेवटी आपल्याच हाती असत
मनात स्वप्न आणि अफाट परिश्रम अजुन काय लागत

-----अनुप चव्हाण

मारुतीला प्रश्न - मराठी कविता/चारोळी, Marathi Poems

मारुतीला प्रश्न - मराठी कविता/चारोळी, Marathi Poems

मारुतीला प्रश्न

मारुतीचा मंदिरात लागली माणसांची रांग

म्हणतात मारुती राया फक्त एक गोष्ट सांग,

तु बाल ब्रह्मचारी, आमचा का उचललास विडा
का आमच्या मागे लावलीस बायकांची हि पिडा?

-----अनुप चव्हाण

Monday, 8 August 2011

I LOVE YOU - Marathi Kavita/charoli, love poem, prem kavita

I LOVE YOU - Marathi Kavita/charoli, love poem, prem kavita

राग आणि चिडचिड आहे प्रेमाचा एक भाग
तू रागव, मी मन्वेन, कित्ती मज्जा त्यात,
प्रेमाने काही बोलले तर होशील का खुश तु?
किती रागावलास तरी प्रिया I LOVE YOU.

-----अनुप चव्हाण

धुंद पाऊस - Marathi Kavita/charolya, prem kavita, love poem

धुंद पाऊस - Marathih Kavita/charolya, prem kavita, love poem

धुंद पाऊस, बेधुंद गारा
अंगाला झोंबतो, मंद गार वारा,
दूर उभी का अशी जवळ ये जरा
बहरून जाईल मग आसमंत हा सारा

---- अनुप चव्हाण